पुस्तक, पुस्तकांची निर्मिती आणि पुस्तकांची खरेदी या सगळ्या गोष्टींच्या शेकडो वर्षांपासून चालत आलेल्या संकल्पना फक्त 15 वर्षांच्या काळात पूर्णपणे बदलून टाकायची किमया जेफ बेझॉस या माणसानं करून दाखवली आहे. त्यानं सुरू केलेल्या ‘अॅमॅझॉन डॉट कॉम’ या वेब साईटनं आधी पुस्तकांचं वितरण, पुस्तकांची खरेदी या गोष्टींच्या संदर्भात प्रचंड धुमाकूळ घातला.
अॅमॅझॉनच्या प्रवासाचा आलेख रेखाटणारं आणि अॅमॅझॉनची सक्सेस स्टोरी सांगणारं हे पुस्तक आहे